गेवराई । वार्ताहर
तहसीलदार धोंडीबा गायकवाड यांनी महसुलच्या पथकाला घेऊन मंगळवार दि.14 रोजी सकाळी 10 वाजता मोमिनपुरा भागातील स्वस्त धान्य दुकान क्रंमाक 1 या मध्ये जाऊन स्पॉट पंचनामा करून, कारवाई केल्याने शहरातील स्वस्त धान्य दुकान धारकामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आमदार लक्ष्मण पवार यांनी आवाहन करून ही, काही दुकानदार गोरगरिब जनतेच्या राशन वाटप करण्यात दिरंगाई व चालढकल करत असल्याने चीड व्यक्त केली जात आहे.
या संबधी अधीक माहिती अशी की, देशासह राज्यात निर्माण झालेल्या कोरोना व्हायरस या आजाराला आळा घालण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. याच काळात जनतेला मुबलक धान्य उपलब्ध व्हावे यासाठी सरकार स्वस्त धान्य दुकाना मार्फत गहु, तांदुळ वाटप सुरु आहे. परंतु काही दुकानदार शासणाच्या आदेशाची पायमली करत असुन दिलेल्या नियमा नुसार राशन वाटप करत नसल्याची तक्रार गेवराई तहसीलदार यांना प्राप्त झाली. याच तक्रारीची दखल घेत शहरातील मोमीनपूरा, खडकपुरा भागातील स्वस्तधान्य दुकान क्र 1 चा महसुल कर्मचार्‍यां मार्फत तहसीलद धोंडीबा गायकवाड यांनी पंचनामा केला. यामध्ये दुकान धारकाच्या धान्य वाटप ठिकानी गहु, तांदुळाचे कट्टे आढळले नाही दुकान धारक सिराज हा 5 किलो तांदुळ कँरीबँग मध्ये बाधुन ग्राहकांना देत असल्याचे प्रथम दर्शनी आढळले. बाकीचे धान्याचे कट्टे कुठे ठेवले हे समजु शकले नाही. हि कारवाई तहसीलदार धोंडीबा गायकवाड, तलाठी राजेश राठोड, महसुल पथकांनी केली. सदर सर्व परिस्थिती पाहता तहसीलदार या दुकान मालकावर काय कारवाई करतात या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.