औरंगाबाद, दि. 12 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1400 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1000 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 105 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 2535 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. कटकट गेट (1), समर्थ नगर (2), रोशन गेट (1), संजय नगर (1), संभाजी कॉलनी (1),सिल्क मील कॉलनी (1), सिडको (1), राम नगर (1), पीर बाजार (2), उस्मानपुरा (1), कबीर नगर, सातारा परिसर (2), रोशनगेट (4), औरंगपुरा (5), सादात नगर (2), बायजीपुरा (3), पुंडलिक नगर (6), सिटी चौक (1), जुना बाजार, न्यू वस्ती (2), चेतना नगर (1), शिवाजी नगर (4), बौद्ध नगर, जवाहार कॉलनी (2), सारंग सोसायटी (2), उत्तम नगर (1), महेश नगर (2), गौतम नगर, जालना रोड (1), न्यू हनुमान नगर (1), जुना मोंढा, गवळीपुरा (1), एन आठ सिडको (1), छावणी परिसर (1), सुंदरवाडी (1), गुलमंडी (1), मुजीब कॉलनी, रोशन गेट (1), विशाल नगर (3), पटेल नगर (2), रेणुका माता मंदिर एन नऊ (1), यशोधरा कॉलनी, नेहरु नगर (1), रहीम नगर (1), भवानी नगर (1), साई नगर, एन सहा,सिडको (1), खोकडपुरा (1), संजय नगर, आकाशवाणी परिसर (1), एन तीन सिडको (1), सिडको टॉउन सेंटर, एन वन (1), संत एकनाथ सोसायटी (2), एन चार सिडको (1), बारी कॉलनी (1), रोजा बाग (1), एमजीएम परिसर (1), बजाज नगर (2) आणि निल्लोड ता. सिल्लोड (3), वैजापूर (1), मारीसूरी कॉलनी, गंगापूर (1), गणेश नगर, पंढरपूर (1), पडेगाव (1), कन्नड (2), मुकुंदवाडी (1), खुलताबाद (1), नारेगाव (3), कानडगाव (1), शताबी नगर (1), मल्हार चौक, विजय नगर, गारखेडा (1), पटेल नगर, बीड बायपास रोड (1), क्रांती चौक पोलिस स्टेशन जवळ (1), सातारा गाव परिसर (1), किराडपुरा (1), एसआरपीएफ परिसर (1), अन्य (4) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 48 महिला आणि 57 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. शिवाजी
आतापर्यंत 1400 जण कोरोनामुक्त
मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1400 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.
घाटीत चार, खासगीत तीन कोरोनाबाधिताचा मृत्यू
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील मदनी कॉलनीतील 65 वर्षीय पुरूष रुग्णाचा 11 जून रोजी सायंकाळी सहा वाजता, रात्री नऊ वाजता एसटी कॉलनी, फाजलपुरा येथील 52 वर्षीय पुरूष, 12 जून रोजी पहाटे 3.30 वाजता कैलास नगरातील 40 वर्षीय पुरूष, मिल कॉर्नर येथील 36 वर्षीय पुरूष रुग्णाचा सकाळी अकरा वाजता या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शहरातील एका खासगी रुग्णालयात 11 जून रोजी रात्री नऊ वाजता पद्मपुरा येथील 50 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष, 12 जून रोजी पहाटे 4.30 वाजता इंदिरा नगर बायजीपुरा येथील 61 वर्षीय पुरूष आणि सकाळी आठ वाजता आंबेडकर नगर, सिडको येथील 62 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष या रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे आतापर्यंत घाटीत 102, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 32, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 135 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
Leave a comment