भराड़ी । वार्ताहर
शनिवार रोजी आमठाणा पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी हे आमठाणा दूरक्षेत्र भागांमध्ये पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे त्यांना घाटनांद्रा बस स्टॉप जवळ आमठाणा रोडवर पांढर्या रंगाची इंडिका कार क्रमांक एम एच 26 ई 0929 मध्ये श्रीरंग राधोबा शिरसाट वय 21 वर्ष व मुस्ताक शगीर पटेल वय 19 वर्षे राहणार धामणी तालुका सिल्लोड यांच्या ताब्यामध्ये 26 हजार 100 रुपये किमतीच्या देशी दारू टँगो पंच नावाचे 09 बॉक्स (432 बॉटल) मिळून आल्याने सदर प्रकरणी पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शनिवार रोजी कोरोना संदर्भाने आमठाणा चौकीचे बीट जमादार देविदास जाधव, सचिन सोनार काकासाहेब सोनवणे हे पोलीस कर्मचारी आमठाणा, घाटनांद्रा येथील भागात खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत होते.संध्याकाळी 6:30 वाजेच्या सुमारास ते घाटनांद्रा येथे पाण्याच्या टाकीजवळ रोडवर असताना त्यांना पाचोरा रोडने आमठाण्याकडे एक पांढर्या रंगाची इंडिका कार क्रमांक एमएच 26 ई 0929 ही गाडी येताना दिसली.
सदर गाडीवर संशय आल्याने सदर गाडीचा पाठलाग करून सदर गाडीला घाटनांद्रा बस स्टँड जवळ थांबविले असता त्यामध्ये बसलेल्या इसमाकडे कोरणा संदर्भाने कोणतेही सुरक्षा दिसत नसल्याने त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव श्रीरंग राधोबा शिरसाट वय 21 वर्ष व मुस्ताक शगीर पटेल वय 19 वर्ष तसेच राहणार धामणी तालुका सिल्लोड असे सांगीतले.यावेळी पोलीस कर्मचा-यांनी गाडीमध्ये काय आहे व गाडीची कागदपत्रे दाखवण्याची मागणी केली असता गाडीची कागदपत्रे नसल्याने त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.यावेळी पोलीस कर्मचा-यांना संशय आल्याने वाहनांची तपासणी केली असता गाडीच्या डिकी मध्ये 26 हजार 100 रुपये किमतीचे देशी दारू टँगो पंच नावाचे नऊ बॉक्स (180 एमएल च्या 432 सीलबंद काचेच्या बॉटल) मिळून आल्याने ती पंचा समक्ष जप्त करण्यात आले आहे. सदर प्रकरणी पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण येथे नमूद इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदरील गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. सचिन सोनार हे करीत आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावंडे, माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. देविदास जाधव पोना. सचिन सोनार व काकासाहेब सोनवणे यांनी केलेली आहे.
Leave a comment