सिल्लोड । वार्ताहर
कोविड-19 या साथिच्या आजाराच्या पार्श्वभूमि वर केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने प्रमाणित व निर्देषित केल्यानुसार आर्सेनिकम अल्बम या होमिओपेथी औषधा चे मोफत वितरण करण्याचा शुभारंभ शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या हस्ते दि.30 में शनिवार रोज़ी करण्यात आला.
शहरातील प्रभाग 2 व 3 मधील काही नागरिकांना प्रतिनिधिक स्वरुपात याचे वितरण करण्यात आले. संस्थेतर्फे सर्व पोलिस बांधवांनाही सदरिल औषध वितरित करण्यात आले. नगरसेविका अश्विनी पवार यांच्या संकलपनेतून साकार होत असलेल्या या उपक्रमाची औषधी औरंगाबादचे प्रसिद्ध डॉ. दिपक कुंकुलाल व डॉ. योगेश ठोंबरे यांनी निर्मित केलि आहे. 1000 नागरिकांना याचा लाभ होणार आहे.यावेळी पोलिस उपनिरीक्षक बालाजी ढगारे,सचिन चौबे, पो. कॉ.के. एम. भाग्यवंत, संस्थेचे अध्यक्ष किरण पा. पवार ,शैलेष शिंदे,कृष्ना गजभारे, धनंजय खम्बाट, पंडित बोरडे, विजय चव्हाण,रामेश्वर घोडके यांची उपस्थिति होती.
Leave a comment