औरंगाबाद । वार्ताहर
येथील आयर्न मॅन नितीन घोरपडे यांनी नुकतेच त्यांच्या राहत्या घरी सलग बारा तास ट्रेनर व 318 किलोमीटर सायकलिंग करित फेसबुक,व्हॉट्सऐपच्या मध्यमातून नागरिकांना पोलीस कल्याण निधी मधे ऐच्छिक राशी जमा करण्याचे आवाहन करुन 40000 रूपयांचा निधी जमा केला. त्यांच्या या योगदानबद्दल पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी कौतुक करित आभार व्यक्त केले आहे. तसेच आयर्न मैन घोरपडे यांच्या व्यायाम व समाजातील सर्व घटकांना मदत करण्याचा गुण सर्वांनी अंगीकारावा असे आवाहनही श्रीमती पाटील यांनी केले.
नितीन घोरपडे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देवदूत रुपाने आमचे रक्षण करनार्या ’पोलिस दल’ सन्मानार्थ निधी जमा करण्यासाठी जनजागृती करित नागरिकांनी घरीच राहुन आपला आवडणारा व्यायाम करावा व इतरांनाही समाज माध्यमाद्वारे यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन केले होते.त्यास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.
Leave a comment