शिवना । वार्ताहर
शिवना परिसरात व गावात माकडांनी धुमाकूळ घातला आहे शेतकऱयांनी रात्रन दिवस मेहनत करून रब्बीचे माल काढले पण ते त्यांच्या खिशात पैशाच्या स्वरूपात जातील याची शाश्वती राहिली नाही कारण शिवना परिसरात 40/40माकडांची एक टोळी अशा जवळपास 3 टोळ्या गावात व शेतात शेतकऱयांचा माल फस्त करत आहे व वन विभाग व त्यांच्या कर्मचार्याला याचा बंदोबस्त करण्यासाठी वेळ नाही ..! आधीच कोरोना मुळे सर्व शेतीमालाचे भाव कमी झाले त्यात आता पुन्हा हे नवीन संकट ..!
विशेष म्हणजे या माकडांच्या टोळीत सर्व नर (म्हाळे) आहेत व त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास ते सर्व मिळून एकट्या माणसावर आक्रमण करतात. वन विभागाने या माकडांना पकडून लावकारत लवकर जंगलात नेऊन सोडावे अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्ग करत आहे
Leave a comment