पैठण । वार्ताहर
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या थाटा-माटात देशात दरवर्षी 31 मे रोजी साजरी होत असते. यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे यंदाची अहिल्यादेवी होळकर जयंती घरी राहुल साजरी करावे, कोणत्याही स्वरूपात सार्वजनिक मिरवणूक करून गर्दी करू नये तसेच लाकडाऊनचा नियम पाळून सहकार्य करावे,असे आव्हान आ. रोहित दादा पवार विचार मंच चे प्रदेशाध्यक्ष राजू पाटील बोंबले यांनी केले आहे.
दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या थाटात मिरवणूक काढून व विविध उपक्रमांनी साजरी केली जाते. यंदा मात्र देशातच नव्हे तर जगात कोरोनाची लागण मोठया प्रमाणात झाली. त्याचे पडसाद आपल्या भारतावर उमटत आहे. कोरोणाची लागन होऊ नये, यासाठी आप-आपल्या घरी 31 मे रोजी सकाळी नऊ वाजता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावे तसेच अभिवादन करतानासुद्धा सोशल डिस्टन्सचे नियम पाळुन सहकार्य करावे असे आव्हान आ.रोहित दादा पवार विचार मंच चे प्रदेशाध्यक्ष राजू पाटील बोंबले यांनी केले आहे.
Leave a comment