ग्रामस्थांची गर्दी....60 वर्षात पहिल्यांदा निसर्गाचा चमत्कार
सोयगाव । मनिषा पाटील
निसर्गाचा केव्हा काय चमत्कार असा अंदाज लावता येणे अवघड आहे.निसर्गाच्या मनात आलेली कोणतीही गोष्ट सहज शक्य होण्याचा प्रत्यय सोयगाव तालुक्यातील किन्ही शिवारातील एका केळीच्या शेतात आला आहे.या शेतातील एकाच झाडाला एकाच ठिकाणी दोन कमळ लागल्याचे शेतकर्याच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी या निसर्गाच्या चमत्काराची पाहणी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
किन्ही ता.सोयगाव शिवार हे जिल्यातील केळी आगार म्हणून ओळखल्या जाते,या शिवारातील गट क्र-106 मध्ये शिंदोळ ता.सोयगाव येथील शेतकरी सुनील सीताराम भदाणे यांची केळी लागवड करण्यात आली आहे.उन्हाळ्यात या केळीला प्रारंभी कमळ लागण्यास सुरुवात झालेली असतांना पाच हजार खोडे लागवडीत असलेल्या केळीच्या बागेत एकाच झाडाला दोन कमळ लागल्याचे या शेतकर्याच्या लक्षात आल्यावरून त्यांनी हा अजब प्रकार गावात सांगितला या प्रकारची पाहणी करण्यसाठी ग्रामस्थांनी मात्र शेतात तोबा गर्दीही केली होती.या घडाच्या कमळला मात्र गणेश मूर्तीचाही आकार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले त्यामुळे गर्दीचे स्वरूप वाढले होते.केळी लागवडीच्या इतिहासात पहिल्यांदा हा निसर्गाचा अजब प्रकार पहावयास मिळाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
Leave a comment