मंठा । वार्ताहर
कोरोना संसर्गजन्य विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मंठा शहरातील व्यापार्याकडून दि 29 शुक्रवार रोजी बाजारपेठ बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद असुन जनतेने सहकार्य करावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांनी केले आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे मंठा शहरातील व्यापारी बांधवांकडून घेण्यात आलेला हा निर्णय कौतुकास्पद असून या निर्णयाला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे सर्व पालन करावे. अत्यावश्यक सेवेतील दवाखाना व मेडिकल हे सुरू राहणार असून उद्या या आठवडी बाजाराचा दिवस असल्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता व्यापारी संघटनेकडून घेतलेल्या निर्णयाला सर्वांनी सहकार्य करावे , असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांनी केले आहे.
Leave a comment