औरंगाबाद । वार्ताहर
अहमदनगर येथून गंगापूर मार्गे शहरात लपून छपून अवैध देशी दारूची वाहतूक करणार्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून व एका कारसह 1 लाख 78 हजार 200 रुपयांची देशी दारू स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केली आहे. विनोद मोहतले (32) व अजय वाहुळ (25 दोघे रा.औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, अहमदनगरहुन गंगापूर मार्गे शहरात अवैधरित्या देशी दारुची वाहतूक होणार आहे.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने नेवरगाव-वाहेगाव रोडवर मनसे चौक येथे सापळा रचला. नमूद ठिकाणी आलेल्या एका कारमध्ये ट्रॅव्हलच्या बॅगेत 1188 देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. दरम्यान, पोलिसांनी दोन आरोपींसह 5 लाख 50 हजार रुपये किमतीची एक कार क्रमांक (चक- 20, ऊत5578) व 1 लाख 78 हजार 200 रुपयांची दारू असा एकूण 7 लाख 28 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Leave a comment