सिल्लोड । वार्ताहर

तालुक्यातील मोढा खुर्द जवळील पूर्णा नदीमध्ये दि.27 मे 2020 रोजी अवैध वाळू वाहतूक करीत असताना तहसील च्या पथकाने अचानक धाड टाकून पकडले. या कारवाईत  सत्यम सांडु महाकाळ (रा.मोंढा खु) यांचे मालकीचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर क्र. (एम.एच.20 ईजे 1283) हे 1 ब्रास क्षमतेचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. सदरील वाहन जप्त करून तहसील कार्यालय सिल्लोड लावण्यात आले.

या प्रकरणी 130400 (अक्षरी-एक लाख तीस हजार चारशे रु मात्र) ची दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित केलेली आहे. सदर कार्यवाही पथक प्रमुख संजय सोनवणे नायब तहसीलदार सिल्लोड, चव्हाण तलाठी, काशिनाथ ताठे, राठोड तलाठी,  संतोष इंगळे तलाठी,  महेंद्र वारकड तलाठी,  संजय जोशी तलाठी  कोतवाल दत्तू साळवे, कोतवाल राजू बसाये, कोतवाल ज्ञानेश्वर बनकर  यांनी सदर  कार्यवाही पूर्ण केली. तसेच  येणार्‍या काळात सुद्धा अवैध गौणखनिज वाहतूक करणार्‍या विरुद्ध अचानक धाडी टाकून अवैध गौणखनिज वाहतूक करणार्‍यांची वाहने जप्त करून दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे श्री रामेश्वर गोरे तहसीलदार सिल्लोड  व श्री ब्रिजेश पाटील उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांनी इशारा दिला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.