औरंगाबाद । वार्ताहर
गेल्या तीन महिन्यापासून शहरात लॉकडाऊन आहे. परिणामी या काळात गरीब गरजू नागरिकांना जीवनावश्यक किराणा साहित्याची मदत व्हावी या हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला. मनसेचे पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष अशोक पवार पाटील यांच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकीतून हि मदत करण्यात आली.
यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्या हस्ते एसटी कॉलनी, एन-2 येथील मनसे संपर्क कार्यालासमोर महानगर पालिकेच्या सफाई कामगारांना हि मदत करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात जसे डॉक्टर, नर्स, पोलीस देवदूता सारखे आपले कर्तव्य बजावत आहेत. त्याचप्रमाणे महापालीकेतील सफाई कामगारही दररोज सकाळी कचरा वेचून व स्वच्छता करून शहराचे आरोग अबाधित ठेवत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे सरसावली असल्याचे मत या उपक्रमाचे आयोजक अशोक पवार पाटील यांनी व्यक्त केले. तर शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी म्हणाले कि, कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढत आहे. याच बरोबर इतर आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कचरा तसेच अस्वच्छता पासून अनेक आजार होण्याची चिन्हे निर्माण होऊ नये म्हणून महानगर पालिकेचे स्वच्छता कर्मचारी कायम आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या व्यस्त कामात एक मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा विभाग अध्यक्ष यांनी गरजू नागरिकांना मदतीचा हात पुढे करून किरणा साहित्याची मदत केली हि कौतुकास्पद बाब आहे.
आणखी नागरिकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम तत्पर राहील असे मनसे शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांनी स्पष्ट केले. यावेळी लॉकडाऊन च्या नियमांचे पालन करत सुरक्षित अंतर तसेच मास्क लावून यावेळी जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
Leave a comment