सोयगाव । वार्ताहर
कोविड-19 च्या लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या विवाह सोहळ्याची अवस्था पाहून वरपक्षाकडील मेहुणे विश्वास डोणगावकर यांनी प्रशासनाकडून दोन्ही बाजूंच्या दहाच वर्हाडीची परवानगी काढून उर्वरित नातेवाईकांना ऑनलाईन विवाह सोहळ्यात सहभागी करून सोयगावात लॉकडाऊनमधील पहिला ऑनलाईन विवाह दि.24 रोजी संपन्न झाला.
सोयगाव येथील चंद्रकांत कुलकर्णी यांचा मुलगा आणि एरंडोल जि,जळगाव येथील पुरुषोत्तम कुलकर्णी यांची कन्या स्वाती आणि सोयगाव येथील अॅड.अतुल कुलकर्णी हे पहिल्यांदाच आयुष्याच्या बंधनात ऑनलाईन अडकले आहे.दोघी पक्षाकडील नातेवाईकांनी विवाह सोहळ्यात ऑनलाईन अक्षदा टाकून सोयगावातील हा घरगुती विवाह दहाच वर्हाडीच्या साक्षीने पार पडला आहे,या विवाह सोहळ्याचे तालुकाभर कौतुक करण्यात येत आहे.
Leave a comment