औरंगाबाद । वार्ताहर
शहरात सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक सुविधेची दुकाने खुली करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वस्तू खरेदीसाठी एकाच ठिकाणी गर्दी करू नये, तसेच खरेदीसाठी जाताना गाडीचा वापर करू नये. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले आहे.
पोलीस आयुक्तालयात माध्यमांशी संवाद साधताना पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली. ते म्हणाले कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे. आरोग्य यंत्रणेच्या योग्य उपचाराने बहुतांश रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शहरात आणखी रुग्ण वाढू नये, म्हणून प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. नागरिकांनीही स्वतःची कुटुंबाची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये, असेही आयुक्त म्हणाले.
Leave a comment