बोरगांव बाजार । वार्ताहर
बोरगांव बाजार ता.सिल्लोड येथे दिनांक 26 जुन रोजी तालुका कृषी कार्यालयामार्फत परिसरातील शेतकर्यांसाठी सोयाबीन उगवण क्षमता तपासणी मोहीम(नाविन्यपुर्ण) उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. यावेळी या उपक्रमात शेतकर्यांनी घरचे सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता चाचणी पेपरवर(नाविन्यपुर्ण उपक्रम)आणि घरगुती बोद्री पोत्यावर कृषी साह्यायक व्ही.एच बनकर यांनी उपस्थित शेतकर्यांना प्रयोग करुन दाखविला व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या नाविन्यपुर्ण उपक्रमामुळे शेतकर्यांना बियाणे विकत घेण्याची गरज पडणार नाही,तसेच उगवण क्षमता सुध्दा चांगली राहील,यामुळे शेतकर्यांच्या पैशाची मोठी बचत सुध्दा होईल,या उपक्रमामुळे शेतकर्यांना स्वत: घरगुती पध्दतीने बियाण्याची तपासणी करुन शेतकर्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे पेरणीस उपलब्ध करता येईल, या उध्देशाने या नाविन्यपुर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,शासनाच्या सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करत सामाजिक अतंर ठेवुन कार्यक्रम दोन टप्यात संपन्न करण्यात आलाङ्ग यावेळी माजी सरपंच समाधान साखरे,दत्तु साखरे, भागवत साखरे,कृषीसाह्यायक व्ही.एच. बनकर, संतोष जगताप,दशरथ लोखंडे, सुनिल जगताप,पठाण, यांच्यासह शेतकऱी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
Leave a comment