औरंगाबाद । वार्ताहर
कोरोनाच्या संचारबंदी मध्ये न झालेल्या महासभेचा प्रश्न सूटला आहे. येत्या 29 मे रोजी विडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे ही महासभा घेण्यात येणार असली तरी नाशिक मनपाच्या इतिहासात हे प्रथमच घडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरजिल्हा प्रशासनाने गर्दी करू नये अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे कालिदास कलामंदिर येथे महासभा घेण्यात यावी अशी मागणी सत्ताधारी भाजपने केली होती. मात्र त्यास विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने विरोध केला होता. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पाहता सोशल डिस्टन्स, मास्क यासह इतर नियम पाळले जातील का या गोष्टीचा विचार करून महापौर सतीश कुलकर्णी यांनी 20 मे होणारी महासभा पुढे ढकलण्याची सूचना केली होती.
आता मात्र त्यावर तोडगा निघाला असून येत्या 29 मे रोजी ही महासभा व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगवर होणार आहे. त्यात सर्व नगरसेवकांना विशिष्ट अॅपवर आयडी आणि पासवर्ड देण्यात येईल. त्यावर महासभेत सहभागी होता येणार आहे. इतिहासात प्रथमच ही महासभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे येत्या 29 मे रोजी होणार आहे. या ऑनलाईन महासभेला आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी परवानगी दिली आहे.
Leave a comment