औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद शहरात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे सातारा परिसरातील राज्य राखीव पोलीस दलाचे 67 जवान कोरोना मुक्त झाल्याने आज त्यांचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
मालेगाव बंदोबस्त वरून परत आल्यानंतर 93 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सातारा परिसर येथील श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये क्वारटाईन करण्यात आले होते. मालेगाव येथून बंदोबस्त वरून परत आल्यानंतर ज्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची कोरोना चाचणी केली असता त्यामधील 74 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. तसेच त्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना क्वारटाईन मुक्त केल्याने सदरील कर्मचारी कोरोनावर मात करून कर्तव्यासाठी तयार झाले आहे.
Leave a comment