रविंद्र काळे यांनी महादेवाला घातले साकडे
पैठण । वार्ताहर
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पैठणचे भुमीपुत्र अशोक चव्हाण यांना कोरोना आजाराची लागण झाली आहे. त्यांनी कोरोणावर मात करून लवकर बरे व्हावे यासाठी पैठण शहरातील प्रसिद्ध सिद्धेश्वर महादेव मंदिरात पंचदिनी रूद्र एकादशनी अभिषेकास काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा शिवाजी नागरी सहकारी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे यांनी प्रारंभ केला असून प्रत्यक्ष महादेवाला साकडे घालत .मंत्री अशोक चव्हान लवकर कोरोनामुक्त होऊन त्यांना दिर्घायुष्य लाभावे अशी यावेळी उपस्थित नागरिक व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना कोरोना लागण झाल्याची बातमी पैठणमध्ये धडकताच पैठणकरांना मोठी हुरहुर लागली. दरम्यान, अशोकराव चव्हान यांची कोरोनातून सुटका व्हावी म्हणून विविध देवालयात नागरिकांनी प्रार्थना केली.
काँग्रेसचे प्रदेश सचिव रविंद्र काळे यांनी पैठण येथील ऐतिहासिक व प्राचीन सिद्धेश्वर घाटातील महादेव मंदिरात पंचदिनी रूद्र एकादशनी अभिषेकास प्रारंभ केला असून पाच दिवस हा अभिषेक सुरू राहणार असल्याचे रवींद्र काळे यांनी सांगितले. महादेव मंदिरात काँग्रेस सेवादलाचे आतिष पितळे, बाजार समितीचे संचालक राजू टेकाळे, युवक काँग्रेसचे औरंगाबाद शहराध्यक्ष गौरव जैस्वाल, दिलीप सनवे, दशरथ सोनवने, सुभाष काळे, आशिष पवार, फौजदार जाधव, जगदिश गोर्डे, भगवान तांबे आदीसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a comment