पोलिसांनी संरक्षण द्यावे, अन्यथा शिवसैनिक सुरक्षा करतील
शिवसेनेने केला भ्याड हल्ल्यांचा केला निषेध
औरंगाबाद । वार्ताहर
गेल्या 20 वर्षात औरंगाबादकरांच्या आशीर्वादाने मी खासदार राहिलो, मात्र माझ्या कुटुंबियातील एकानेही असे कृत्य केले नाही. मात्र दोन महिन्यांपूर्वी भाजप राज्यसभा खासदार झालेले भागवत कराड यांच्या मुलाने दोन दिवापूर्वी कुणाल नितीन मराठे या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केला. अजून शपथविधीही पार पडला नाही, तर लगेच त्यांच्या नावावर गुंडगिरी सुरु झाली आहे. यामुळे असे भ्याड हल्लाचे शिवसेना निषेध करत असल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
यावेळी मराठे कुटुंबातील सदस्यांची आस्थावाईकपणे चौकशी केली. पोलिसांना याप्रकरणी कठोर कारवाई करून मराठे कुटुंबियांना न्याय द्यावा, अन्यस्था शिवसैनिक संरक्षण करतील असे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर, शाखाप्रमुख महेश मल्लेकर शाखा संघटक स्मिता जोशी यांची उपस्थिती होती.
Leave a comment