विहामाडंवा । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून पैठण येथील शिवाजी बँक व फोस्टर होमिओपॅथी मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने पैठण तालुक्यतील विविध गावात होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
पैठण शहराबरोबरच आता ग्रामीण भागातही कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी औषधी गोळ्यांचा तीन दिवसांचा एका कुटुंबाला पुरेल इतक्या प्रमाणात डोस पैठण शहरात व विहामांडवा,नवगाव,पाचोड आपेगाव, हिरडपुरी,आदी गावात शिवाजी नागरी बँकेचे चेअरमन रविंद्रदादा काळे यांच्या हस्ते विनामूल्य वाटप करण्यात आले.
Leave a comment