शहर सह तालुक्यात जवळपास 3500 किट्स चे वाटप करण्यात आले आहे.
खुलताबाद । वार्ताहर
सध्या देशभरात नव्हे तर जगभरात कोरोना या महामारी ने धुमाकूळ घातले आहे. महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या भयानक परिस्थिति उभी राहिली आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये रोजगाराची सर्व दारे बंद असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अनेकांची हातची कामे गेले आहेत त्याच अनुषंगाने ज्यांचे हातावर पोट आहे. खुलताबाद शहरात तसेच तालुक्यात अशा गरजू कुटुंबांना गंगापुर- खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांच्याकडुन किराणा किटचे वाटप करण्यात आले.या सर्व कीट वाटप चे नियोजन पंचायत समिती सभापती गणेश आधाने, माजी सभापती अर्चना अंभोरे तसेच दिनेश अंभोरे यांच्या नियंत्रणाखाली शहर सह तालुक्यातील जवळपास सर्व गावांमध्ये व्यवस्थित रित्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या हस्ते गरजू कुटुंबांना किराणा किट्स चे वाटप करण्यात आले. या वेळी किराणा किटचे लाभार्थींकडुन विशेष आभार मानण्यात आले.
Leave a comment