झोपडी ही पेटवली; फर्दापूर पोलिस ठाण्यात अॅट्रासिटीचा गून्हा दाखल
फर्दापूर । वार्ताहर
मुंबई हून गावी परतलेल्या लोकांना शेतातील झोपडीत राहू देण्यास नकार देणार्या एकास जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करीत त्याची झोपडी पेटवून देणार्या टिटवी(ता.सोयगाव)येथील बारा जणांन विरूध्द फर्दापूर पोलिस ठाण्यात ट्रासिटीचा गून्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून प्राप्त अधिकृत वृत्त असे की पळसखेडा (ता.सोयगाव) येथील मशेरखॉ लालखॉ तडवी (वय 25) यांनी फर्दापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की टिटवी (ता.सोयगाव) येथील काही लोक नूकतेच मुंबई हून गावी परतले आहे कोरोनाच्या धास्तीने टिटवी येथील नागरिकांनी मुंबईहून परतलेल्या लोकांना काही दिवस गावाबाहेर राहण्यास सांगितल्याने दि.22 शुक्रवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास सदरील दहा ते बारा लोक मशेरखॉ तडवी यांच्या शेतात आले व त्यांनी मशेरखॉ कडे तुझ्या शेतातील झोपडीत आम्हाला राहू दे अशी मागणी केली मात्र मशेरखॉ शेतात लहान मुलाबाळांन सोबत राहत असल्याने मशेरखॉ तडवी याने सदरील लोकांना शेतातील झोपडी राहण्यासाठी देण्यास नकार दिला या गोष्टीचा राग मनात धरून मुंबई हून परतलेल्या या दहा-बारा लोकांनी मशेरखॉ तडवी यास जातीवाचक शिवीगाळ करुन मोटारसायकलवर दगड मारुन मारहाण करीत मशेरखॉ च्या शेतातील गवताची झोपडी पेटवून देत बारा हजार रुपयांचे नूकसान केले दरम्यान मशेरखॉ लालखॉ तडवी यांच्या फिर्यादी वरुन सोपान देवचंद राठोड,कृष्णा हिरामण राठोड,निलेश दिवाणसिंग राठोड,ज्ञानेश्वर देवसिंग राठोड,योगेश दिवाणसिंग राठोड,ज्ञानेश्वर देवचंद राठोड,हिरामण फत्तू राठोड(सर्व रा.टिटवी ता.सोयगाव) यांच्या सह एकूण बारा आरोपीन विरूध्द फर्दापूर पोलिस ठाण्यात ट्रासिटी क्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास एपीआय प्रतापसिंह बहूरे सा.फौ पोपटराव कांबळे हे करीत आहे.
Leave a comment