औरंगाबाद । वार्ताहर
कन्नड तालुक्याचे माजी आमदार व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातुन निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली, त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राज्याच्या राजकारणातल नेहमी चर्चेत असणार नाव म्हणजे माजी आमदार हर्षवर्धन जाधव. त्यांनी आज अचानक राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.
हर्षवर्धन जाधव हे कन्नड शहराचे आमदार राहिलेले आहे. त्यांनी मागील लोकसभा निवडणुकही लढवली होती. मात्र त्यांना त्यामध्ये यश मिळू शकले नाही. एका व्हिडीओद्वारे त्यांनी आज ही घोषणा केली. त्यावेळी ते म्हणाले की, सध्या लॉकडाउन सुरू आहे. प्रत्येक जण आपापले छंद जोपासत आहे. मी देखील माझ्या अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. त्यातून मला कळलं की, आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो, त्या कितपत खर्या आहेत याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेत आहे. माझी उत्तराधिकारी पत्नी संजना जाधव असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Leave a comment