50 हजारहुन अधिक गरजूंना दिला आधार

औरंगाबाद । वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्चपासून लॉकडाऊन लागू झाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने गेल्या 64 दिवसापासून अखंड मदतयज्ञ सुरू आहे. या अन्नदानामुळे जवळपास 50 हजार गरजूंना लाभ झाला आहे.  शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून संभाजीनगर येथील शेकडो मजूर, कामगार, गरजू लोकांना ही मदत पोहचली जाते. दररोज विविध ठिकाणच्या 1 हजार लोकांचे अन्नदान या वाहनातून केले जाते. तसेच स्थानिक असलेल्या नागरिकांना 15 हजार नागरिकांना किराणा कीट व अन्नधान्य दिले आहे.

भाजी पोळी, मसाले भात, शिरा, यांसह जेवणाच्या किट, पाणी बॉटल्स आदी साहित्य पुरविले जाते. शहरातील घाटी, जिल्हा रुग्णालय, बस स्टँड, जेजे हॉस्पिटल, शनी मंदिर, अयोध्या नगरी, बायपास, सिडको, अदालत रोडवरील निवारा गृह, रेल्वे स्टेशन परिसरात दररोज ही व्यवस्था करण्यात येणार आहे. यावेळी उद्योजक सोमनाथअप्पा साखरे ऍड. आशुतोष डंख, प्रतीक बाफना आदी उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.