भारतीय स्टेट बॅकेचा मनमानी कारभार; खातेधारकांनी केला तिव्र संताप
पैठण । नंदकिशोर मगरे
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशात लॉकडाऊन लागू केले आहे .त्यातच काही आत्यावश्यक सेवेत असणारे बॅक , मेडिकल व हॉस्पिटल आदींचा सामावेश आहे मात्र आत्यावश्यक सेवेत येणारी शहरातील भाजी मार्केट येथील भारतीय स्टेट बॅकेचे व्यावस्थापक व कर्मचारी यांनी दि 22 शुक्रवार रोजी मनमानी करत शाखा बंद ठेवून खातेदारांची अडचण निर्माण केल्याचे पहावयास मिळाले.
सदरिल व्यावस्थापक पंकज यादव यांची भेट घेवून विचारणा केली असता सिस्टमची समस्या आहे तर कधी लॉकडावूनमुळे बंद ठेवली असे दुटप्पी पणाचे उत्तर देवून हात वर करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र शहरातील काही व्यापारी यांचे पैसे जमा तर काहींचे काढण्यात आले आहे .हे कसं काय झाले असे विचारले असता व्यावस्थापकाची पुर्ती धांदल उडाली मात्र बॅकेतील कर्मचारी महेश बांगडे व कपीश बंन्सल यांनी लोकप्रश्न प्रतिनिधीला उलट प्रश्न करून तुम्ही शाखेत कसे आले .तुम्हाला काय अधिकार असे म्हणत दादागिरीची भाषा वाफरून असभ्य वर्तणूक दिली व तुम्ही आमची बातमी छापाल तर आम्ही तुमच्या वरिष्ठाकडे जावू असा दमही दिला .यावरून एक बाब स्पष्ठ होते की हे कर्मचारी कमी व गुंड प्रवृत्ती ठासून भरलेले इसम आहेत .त्यातच मुस्लीम बांधवांचा रमजान सन जवळ आला आहे .बॅकेतून त्यांना पैसे काढून काही खरेदी करायची होती मात्र सदरिल शाखेचा समोरचा दरवाजा बंद ठेवल्याने खातेदाराची चांगलीच अडचण झाली.मात्र खातेदारांच्या गैरसोयीच्या प्रकारावर वरिष्ठाने दखल घेवून चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी खातेदारातून होत आहे.
Leave a comment