औरंगाबाद । वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात 21 ते 25  मे या कालावधीत रोज सकाळी सात ते दुपारी एकदरम्यान संचारबंदी शिथिल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, मात्र शहर पोलिसांनी बंदोबस्त नेहमीप्रमाणे कायम ठेवला आहे. दरम्यान  पोलिसांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 771  वाहनधारकांवर कारवाई केली असून, 171 वाहने जप्त केली आहेत.

अत्यावश्यक सेवांची दुकाने आजपासून पाच दिवसांसाठी उघडण्याची परवानगी शासनाने दिली आहे. सकाळी सात ते दुपारी एक या काळात ही दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहे. सहा दिवसांच्या सलग कठोर ’लॉकडाऊन’नंतर ही संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकाराता येत नाही. यामुळे शहर पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी देखील ’पार्किंग’चे नियोजन केले असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली. जुना मोंढा, जाधववाडी, शहागंज, औरंगपुरा आदी भागांत खरेदीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे या ठिकाणी फिक्स पॉइंट; तसेच गस्त असेल. नागरिकांनी खरेदी करताना जास्त गर्दी करू नये; तसेच सुरक्षित वावरण्याच्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन सहायक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे यांनी केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.