सोयगाव, दि.21 (प्रतिनिधी)

सोयगाव शहरातील नगरपंचायत तर्फे कोविड -19 कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या उदात्त हेतूने व शहरातील खाजगी डॉक्टर याचे मदतीने ’ डॉक्टर आपल्या दारी ही मोहीम नगरपंचायतने सुरू करण्यात आली असून दि.19 व 20 रोजी सकाळी 9 वाजता वॉड क्रमांक.16-17(काळे नगर) या परिसरात सदर मोहिमेचा प्रारंभ नगरपंचायत सदस्या श्रीमती शोभाबाई संजय मोरे याचे उपस्थिती झाला,यावेळी डॉ. प्रवीण पाटील  याच्या मार्फत  तपासणी करण्यात आली,

यावेळी संजय मोरे,डिंगाबर वाघ,शिक्षक ज्ञानेश्वर एलिस, नगरपंचायत कर्मचारी राजेंद्र जंजाळ,आशा सेविका शिलताई बनसोडे, भिकाबाई गायकवाड,याचे सह परिसरातील नागरिक उपस्थित होते,डॉक्टर आपल्या दारी मोहिम ही योजना नगरपंचायतचे मुख्याधिकारी सचिन तामखडे, याच्या प्रेरणेतून साकारण्यात येत असून  सदर मोहीम ही शहरभर राबविण्यात येत असून या कामी नगरपंचायतनचे कार्यालयीन अधीक्षक भगवान शिंदे,नगराध्यक्ष ,उपाध्यक्षा, सर्व नगरसेवक,नगरसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडीत आहे.याकामी  सर्व नागरिकानी आपली तपासणी करून घ्यावी असे आव्हान कार्यालयीन अधीक्षक भगवान शिंदे यांनी केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.