बाधितात पाटोदा तालुक्यातील 3 तर वडवणीतील एकाचा समावेश
मोठा दिलासा ; 90 अहवाल निगेटिव्ह
बीड । वार्ताहर
जिल्ह्यातून बुधवारी (दि.20) तपासणीला पाठवलेल्या एकूण 113 थ्रोट स्वॅबपैकी 4 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तर 90 अहवाल निगेटिव्ह आले असून 13 अहवाल प्रलंबित आहेत.याशिवाय 6 जणांच्या अहवालाचा निष्कर्ष निघालेला नाही त्यामुळे आता जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या एकूण बाधितांचा आकडा 16 झाला आहे. मधरात्री 12.25 वाजता हे अहवाल प्राप्त झाले. महत्वाचे हे की,बीड जिल्ह्यातून एकाचवेळी 100 पेक्षा अधिक स्वॅब तपासणीला जाण्याची पहिलीच वेळ होती. या रिपोर्टकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
बुधवारी नव्याने 113 लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. जिल्ह्यात मंगळवारपर्यंत 20 कोरोनाबाधित आढळले होते. पैकी आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील एका रुग्णाचा मृत्यू तर 6 बाधीत रुग्ण उपचारासाठी पुण्याला गेले आहेत. त्यामुळे त्यांची संख्या जिल्ह्याच्या एकूण आकडेवारीतून वगळण्यात आली असून बुधवारपर्यंत जिल्हा रुग्णालयात 12 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यात बुधवारी आणखी 4 रुग्णांची भर पडली आहे.आजच्या बाधीत रुग्णांमध्ये पाटोदा तालुक्यातील 3 व वडवणीतील 1 रुग्णाचा समावेश आहे अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तसेच आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
धाकधूक कायम
बीड जिल्ह्यातील संशयित रुग्णांचे थ्रोट स्वॅब सुरुवातीला पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले जात. नंतर औरंगाबाद आणि लातूरच्या प्रयोगशाळेत स्वॅब पाठवले जाऊ लागले. सध्या सर्व स्वॅब नमुने लातूरला पाठवले जात आहेत. मंगळवारी पाठवलेले स्वॅब अहवाल मध्यरात्री 1 वा. जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मिळाले. त्यानंतर बुधवारी सकाळीही 114 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवले गेले. त्याचे रिपोर्ट काय येतात? याची जिल्हाभरातील नागरिकांना धाकधूक होती. अनेकजण रात्री उशीरापर्यंत मोबाईलवर अपडेट तपासत होते.
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेची प्रेस नोट
आज दिनांक 20.05.2020 रोजी एकुण 246 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 44 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 40 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन (त्यामध्ये पॉझिटीव्ह व्यक्तींवर उपचार करतान संपर्कात आलेले डॉक्टर्स, नर्सेस, तंत्रज्ञ व वर्ग ४ कर्मचारी यांचा समावेश आहे ) ही अत्यंत दिलासादायक बाब आहे व एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एका व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला असल्यामुळे त्यांची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे उर्वरीत 2 व्यक्तीचे अहवाल प्रलंबित आहेत.
उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 12 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी 11 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित आहे. निलंगा येथुन 13 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले हाते त्यापैकी 11 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले असून दोन व्यक्तीचे अहवाल प्रलंबित आहेत. देवणी 12, जळकोट 5, रेणापूर 6, स्त्री रुग्णालय लातूर येथील 4 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या सर्वच व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. लातुर जिल्हयातील असे एकुण 96 स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 89 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, एक व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला आहे व 5 व्यक्तिचे अहवाल प्रलंबित आहेत.
बीड जिल्हयातील 113 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 90 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 4 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत व 6 व्यक्तीचे अहवाल (Inconclusive) आले असून 13 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. उस्मानाबाद जिल्हयातील 37 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 33 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 4 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत असे एकुण आज 246 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन 212 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत व 7 व्यक्तीचे अहवाल (Inconclusive) आले आहेत व 22 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
Leave a comment