मुगगावच्या माजी सैनिक अंकुश खोटेंचा उपक्रम

आष्टी । शरद रेडेकर

अडचणीच्या काळात माणूसकीचा धर्म जागवुन माणूस वाचवण्यासाठी प्रयत्न करणे हीच खरी मानवता आहे, या विचारांचा पगडा असलेल्या मुगगाव येथील माजी सैनिक तथा भोलेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अंकुश खोटे यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत सौताडा गणातील दहा गावातील निराधार,वयोवृध्द, घटस्फोटीत, विधवा ,दिव्यांग अशा 90 कुटुंबाला एक महीना पुरेल एवढा किराणा सामान तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. अगोदर देशाची सेवा केली आणि आता संकटात सापडलेल्या निराधारांची.पंढरपुरच्या पांडुरंगाचे दर्शन बंद असले तरी,पांडुरंगानेच आमच्यासाठी तुला धाडल्याची प्रतिक्रिया निराधारांनी यावेळी व्यक्त करीत आशिर्वाद देत आभार मानले.

कोरोनाचे संकट भारतभर गडत होत असल्याचे चित्र दिसत असतानाच हे संकट कधी संपेल हे माहिती नाही, घरात बसने हाच एक उत्तम पर्याय आहे.त्यामुळे प्रशासन घरातच थांबा, कामाशिवाय बाहेर पडु नका असे कळकळीने सांगत आहे, परंतु अद्यापही काही युवक हूल्लडपणे बाहेर फिरताना दिसत आहेत. लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणार्‍या अनेकांच्या घरातील अन्न-धान्य संपत चालली असुन पुढील काळाची भिती त्यांच्यमध्ये जाणवत आहे. माजी सैनिक अंकुश खोटे यांना अनेकांना मदतीची गरज असल्याचे लक्षात येताच खरोखरच गरज असणार्‍या सौताडा गणातील दहा गावातील नव्वद कुटुंबाला तेल,साखर,चहापुडा, शेंगदाणे, हरबरा दाळ,व्हिल साबन,मिठ,गरा,खोबरेतेल अशा गरजेच्या वस्तू आणि पालेभाज्या घेण्यासाठी रोख शंभर रुपये त्यांच्या घरी जाऊन पोहच केले. मुगागाव,चिंचोली, चिखली, निवडुंगा, अंतापुर, लांभरवाडी वहाली, सावरगाव, सुप्पा, सौताडा आदी गावातील निराधारांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले. याउपवरही जे खरोखरच गरजु असतील त्यांनाही यापुढील काळात मदत करण्यासाठी पुढे येणार असल्याचे अंकुश खोटे यांनी सांगितले. याप्रसंगी माजी सरपंच बबन सांगळे,प्रा.लक्ष्मण सांगळे,जालिंदर भवर,बबन खोटे,गहिनिनाथ येवले,आबा सुळे, परसु गडे,आंकुश लांभरुड,भारत मानमोडे,सरपंच रामचंद्र सानप,बाळु भराटे,नितीन सानप आदी उपस्थिती होते संकटकाळी मदतीला धाऊन आल्याबद्दल निराधारांनी माजी सैनिक आंकुश खोटे यांचे आभार मानले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.