औरंगाबाद । वार्ताहर
कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बाधित झालेल्या रुग्णांवर आरोग्य यंत्रणेने यशस्वी उपचार केल्यानंतर आज शहराच्या विविध भागातील 50 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) एक, जिल्हा सामान्य रूग्णालय (मिनी घाटी) 16, मनपा कोविड केअर सेंटरमधून 25 आणि दोन खासगी रुग्णालयातून आठ यांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 451 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मिनी घाटीतून आज 16 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामध्ये रामनगर येथील 12, बेगमपुरा येथील एक, पुंडलिक नगर येथील तीन व दत्त नगरमधील एका रुग्णाचा समावेश आहे, असे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले. एमआयटी कॉलेज बीड बायपास येथून सिल्क मिल कॉलनीतील सहा, एमजीएम कोविड स्पोटर्स येथील कोविड केअर सेंटरमधून राम नगर गल्ली क्रमांक एकमधील आठ, न्याय नगर, गारखेडा गल्ली क्रमांक सात येथील पाच, किल्ले अर्क कोविड केंद्रातून संजय नगर एक, दत्त नगर लेन क्रमांक पाच येथील एक, चंपा चौकातील तीन, बेगमपुरा येथील एक आणि दोन खासगी रुग्णालयातून आठ अशा मनपा कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या 33 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचारानंतर त्यांना आज सुटी देण्यात आलेली आहे, असे मनपा प्रशासनाने कळवले. घाटीत इंदिरा नगरातील 28 वर्षीय कोरोनाबाधित महिलेची यशस्वीरित्या सुलभ प्रसूती करण्यात आली होती. त्या महिलेने 2.8 किलो वजनाच्या मुलीस जन्म दिला. या दोघींची प्रकृती उत्तम आहे. प्रसूत महिलेवर यशस्वी उपचारानंतर मार्गदर्शक नियमानुसार त्यांना आज सुटी देण्यात आली. आतापर्यंत घाटी रुग्णालयातून 27 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलेले आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
                              
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment