औरंगाबाद । वार्ताहर
21 मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. कोरोना या विषाणू संसर्गने थैमान घातलेला आहे. आतापर्यंत आपल्या भारतात लाखांचा घरात पेंशट झालेले आहे. हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. दौलताबाद येथून शहरात ये जा करतात नागरीक यांची कडक तपासणी करूनच येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी सोडतात आपल्या जीवाची पर्वा न करता हे पोलीस आपले कर्तव्ये पार पाडीत आहे दौलताबाद येथील समाजसेवक तथा जनक्रांती संघटनेचे ता. अध्यक्ष शेख लाला हे पण सतत पोलीसांना मदत करीत आहे.
दौलताबाद घाटगेट येथे नाका-बंदीत कर्तव्येवर असलेले पीएसआय श्री कदम सोबत पोलीस शिपाई रामेश्वर थोरात, रेशीम वाले, होमगार्ड सय्यद नईम,तुळशीराम पवार, तुकाराम पवार,ट्राफिक कर्मचारी दिलीप सोनार,वाहतूक शाखा व पोलीस मित्र शेख जमील असे नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करीत आहे.
Leave a comment