शिवना । वार्ताहर
शिवना ता.सिल्लोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या एका वैद्यकीय अधिकार्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती सोमवारी दुपारी सोशल मीडियावर व्हायरल होताच परिसरात खळबळ उडने ही साहजिक बाब आहे. मात्र, संबधित वैद्यकीय अधिकारी गेल्या दोन आठवडयांपासून रजेवर आहेत. त्यामुळे जनतेने घाबरून न जाता सुरक्षित रहावे असे आवाहन येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जवेरिया शेख यांनी केले आहे. येथील बाधित डॉक्टर त्यांच्या वडिलांना कोरोनाची लागन झाल्यामुळे नऊ में पासून औरंगाबादला आहेत. प्राशासनाने त्यांना होम कॉरनटाईन ही केले असेल तरीही अनावधानाने कुणी त्यांच्या सम्पर्कत आले असेल तर त्यांनी आपले स्वाब नमूने देण्यासाठी पुढे यावे. असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मी स्वतः तालुका आरोग्य आधिकारी डॉ.रेखा भंडारी यांच्याशी बोललोय त्यांनीसुद्धा नागरिकांनी थर्मल स्क्रीनिंगसाठी समोर यावे, आपले नमुने द्यावेत आणि आपला गाव सुरक्षित ठेवावा, घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.
Leave a comment