पाचोड । विजय चिडे
देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने लॉकडाऊन केले होते परंतु कोरोना हा आटोक्यात येत नसल्याने लाँकडाऊन पुन्हा चौथ्यांदा वाढविण्यात आले आहे.त्यामूळे लग्न घरच्याकडुन खरेदीपासून पत्रिका तयार करणे ती वाटप करण्याचे नियोजन कोलमडले. त्यामुळे भावी वर वधूच्या स्वप्नावर पाणी फिरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तसेच अनेक ठिकाणी लग्नसोळहा पुढे ढकलण्यात आली आहेत यामुळे लग्न कशी उरकावयाची, असा प्रश्न वधप-वर मंडळींना पडला आहे.
कोरोणामुळे लग्न जमलेल्या थांबले आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लागू असल्यामुळे चारपेक्षा अधिक नागरिक एकत्र येऊ शकत नाही त्यामुळे लग्नाला शोभा राहत नाही. त्याकरिता यंदा तर लग्न होणारच नाही परंतु कोरोणाही थांबणार कि नाही ? त्यामुळे नाविलाज असतो चार माणसांमध्ये लग्न उरकून घ्यावे लागत आहे. अशी प्रतिक्रिया तालुक्यातिल भावी नवरदेवानी दिल्या आहे. मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात सर्वत्र लग्नसराईचा जल्लोष बघायला मिळत असतो परंतू कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असल्यामुळे पूर्वनियोजित लग्न समारंभ आणि साखरपुड्याचे नियोजन विस्कटले आहे. अधिक लोकांना एकत्र जमा होण्यास मज्जाव असल्यामुळे व खरेदीसाठी बाजारपेठ खुली नसल्याने सध्या लग्नसराईला कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. लहान-लहान गावांतील वधु-वर एकत्र येत लग्नसराईची खरेदी करतात. शहरासह, तालुकास्तरावर अनेक ठिकाणाहून होलसेल साड्यांचा बसता वर- वधुचे कपडे, दागिने, भांडी आदींची एकदम खरेदी करीत असतात. मात्र, शहरासह ग्रामीण भागातही लॉकडाऊन असल्याने तसेच वाहने बंद असल्याने ही खरेदी रखडली आहे. लग्न म्हणजे भरपूर खरेदी नातेवाईकांत जल्लोषाचे वातावरण असते. पण कोरोनाचे संकट सर्व देशभरात पाय पसरू लागले आहे.
त्यांमुळे सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. जीवनाश्यक सोडून इतर सर्व वस्तूंची दुकाने आणि सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश धडकले आहे. 4 पेक्षा अधिक लोकांना एकत्रित जमा येण्यास मज्जाव केल्यामुळे पूर्वनियोजित लग्न समारंभ व साखरपुड्याचे वेळापत्रक विस्कटले आहे. काहींनी हे समारंभ पुढे ढकलले, तर काहीजण मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ उरकू न घेत आहेत. बरेचदा इतर वेळी भरपूर खरेदी आणि नातेवाईकांच्या उपस्थित होणारे हे समारंभ सध्या थंडबस्त्यात आहेत.
मुहूर्त बदलूनही ऐनवेळी टळले
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनाने लॉकडाऊनसह संचारबंदी लागू केली आहे. परिणामी ज्या कुटुंबाकडे विवाह व साखरपुडा समारंभाचे आयोजन केले होते. अशा काही मंडळीने सुरूवातीला मार्च व त्यानंतर एप्रिल महिन्यातील विवाह व साखरपुड्याचे मुहूर्त काढले. परंतु, कोरोनामुळे एक नव्हे तर दोनदोन वेळा मुहूर्त रद्द करावा लागला. यशिवाय बाजारपेठ बंद असल्याने विवाह समारंभाची खरेदीही बारगळल्याचे वर-वधू पित्यांकडून सांगण्यात येत आहे.
Leave a comment