खादगाव येथील घटना
पाचोड । वार्ताहर
संपूर्ण देशात 22 मार्च पासून लोक डाऊन सुरू असल्याने अनेकांचे विवाहाच्या तीथी काढूनही पुढे ढकलण्यात आलेल्या असतानाही ता. 17,रविवार रोजी रात्री दहा वाजता एका अल्पवयीन मुलीचा विवाह गुपचूप लावून दिल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार 18 तारखेचा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना खादगाव येथे घडली
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर कोल्हे यांची मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहित असताना तिचा विवाह गोपनीयरित्या साईनाथ गणपत देशमुख यांच्यासोबत ज्ञानेश्वर कोल्हे यांच्या राहत्या घरात गुपचूप विधीपूर्वक लग्न लावून देऊन तिचा बालविवाह केला आहे .अशी तक्रार पोलिस ठाणे पाचोड येथे प्राप्त झाल्यावरून गुन्हा बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कायदा अन्वये दाखल करण्यात आलेला आहे .खादगाव येथील ज्ञानेश्वर कोल्हे राहणारे यांच्या अल्पवयीन मुलीचा मुलीचा विवाह साईनाथ याच्याशी गणपत धोंडीबा देशमुख यांच्या मुलासोबत लावून दिला या अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी 1) ज्ञानेश्वर भानुदास कोल्हे 2)अनिता ज्ञानेश्वर कोल्हे दोन्ही राहणार खातगाव तालुका पैठण 3) मंदाबाई गणपत देशमुख 4) गणपत धोंडीबा देशमुख 5) साईनाथ गणपत देशमुख तिन्ही राहणार दरेगाव तालुका पैठण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस अधीक्षक भामरे ,स.पो.नी अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार पो.ना नुसरत शेख, पो.ना गोरखनाथ कणसे हे करत आहे.
Leave a comment