फर्दापूर पोलिसांची कारवाई
सागर भुजबळ
फर्दापूर दि.17(प्रतिनिधी) विना परवाना अवैधरीत्या लाकडाची वाहतूक करणार्या ट्रकवर फर्दापूर पोलिसांनी कारवाई करुन सदरील ट्रक पुढील कारवाई साठी वनपरीक्षेत्र अधिकारी अजिंठा यांच्या ताब्यात दिला आहे ही कारवाई दि.17 रविवारी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास फर्दापूर येथील औरंगाबाद-जळगाव महामार्गावर जमादार अण्णा गवळी पो.कॉ संजय कोळी यांनी केली आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन असल्याने जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर सर्व वाहतूक बंद करुन जिल्हा सीमा सिल करण्यात आल्या आहेत मात्र या परीस्थितीत ही काही महाभाग नफेखोरीच्या उद्देशाने परवाना नसलेल्या वस्तूंची अवैधरीत्या वाहतूक करण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे.
दरम्यान रविवारी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास एपीआय प्रतापसिंह बहूरे यांच्या मार्गदर्शना वरुन जमादार अण्णा गवळी पो.कॉ संजय कोळी यांचे पथक फर्दापूर येथील औरंगाबाद-जळगाव महामार्गावर गस्त घालत असतांना त्यांना ट्रक (क्र.एमएच 19 झेड 0342) भरधाव वेगात औरंगाबाद कडून जळगावच्या दिशेने जातांना दिसून आला पोलिसांनी ट्रक थांबवून चालक शेख नईम शेख सांडू (रा.अजिंठा ता.सिल्लोड) यास विचारपूस करुन सदरील ट्रक तपासला असता सदरील ट्रक मध्ये लाकूड भरल्याचे दिसून आले मात्र या लाकडाचा वाहतूक परवाना ट्रक चालक शेख नईम याच्या कडे नसल्याने अवैध लाकूड वाहतूक प्रकरणी पोलिसांनी ट्रक जप्त करुन पुढील कारवाई साठी वनपरीक्षेत्र अधिकारी अजिंठा यांच्या ताब्यात दिला आहे.
Leave a comment