औरंगाबाद । वार्ताहर

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जिल्ह्यात 962 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 312 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.  

  महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटर, जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी) या ठिकाणी कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. या यंत्रणेतील डॉक्टर्स, परिचारिका, ब्रदर्स, आरोग्य कर्मचारी, सेवक आदी कोरोना वॉरिअर्सच्या अथक परिश्रमातून व यशस्वी उपचारानंतर आजपर्यंत एकूण 312 रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत सर्वात अधिक म्हणजे 180 रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातून 112 रुग्ण बरे झालेले आहेत. तसेच घाटीतून 20 रुग्ण बरे झालेले आहेत, असेही कळविलेले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.