औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद शहरात आज 59 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 901 झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एमजीएम मेडिकल कॉलेज (3), हनुमान चौक, चिकलठाणा (1), राम नगर (3), एमआयडीसी (1), जालान नगर (1), संजय नगर, लेन नं.6 (3), सादात नगर (4), किराडपुरा (1), बजाज नगर (1), जिनसी रामनासपुरा (1), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच (1), जहागीरदार कॉलनी (1), आदर्श कॉलनी (1), रोशन गेट (1), शंभू नगर (7), सिटी चौक (1), कैलास नगर (1), चाऊस कॉलनी (1), मकसूद कॉलनी (2), हुसेन कॉलनी (4), जाधववाडी (1), न्यू बायजीपुरा, गल्ली नं.3 (1), एन सहा, संभाजी कॉलनी, सिडको (1), कटकट गेट (1), बायजीपुरा (10), अमर को- ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ, सिडको (2), लेबर कॉलनी (1), जटवाडा (1), राहुल नगर (1) आणि जलाल कॉलनी (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 33 पुरुष आणि 26 महिला रुग्णांचा समावेश आहे. तर 255 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राहुल नगरातील 60 वर्षीय महिलेचा 15 मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने आजपर्यंत 26 रुग्णांचा कोरोना आजारामुळे मृत्यू झालेला आहे, असेही कळवण्यात आले आहे.
Leave a comment