औरंगाबाद । वार्ताहर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी अत्यावश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. कंन्टेंनमेंट झोनमध्ये आता पोलिस प्रशासनाला मदत करण्यासाठी कंन्टेंनमेंट झोनमधील क्षेत्रात पायी गस्ती घालणार्‍या (ऋेेीं झींीेश्रश्रळपस) पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ झानोबा बानापुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. शहरातील कंन्टेंनमेंट झोनमध्ये पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून कंन्टेंनमेंट झोनमधून नागकिरंाचे बाहेरील भागात तसेच बाहेरील भागातील नागरिकांचे कंन्टेंनमेंट झोनमध्ये होणार्‍या आवगमन बंद करण्यासाठी या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या पथकाने र्उेााीपळींू िेश्रळलळपस चे काम कारावे, नेमून दिलेल्या भागातील अधिकारी/ नागरिकांचा थहर्रींीीि र्ॠीेीि  तयार करून नागरिकांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासंबंधी सुचना/ मार्गदर्शन करावे, नेमून दिलेल्या संपूर्ण क्षेत्रात 5 ते 6 वेळेस पायी गस्त घालावी, नागरिकांमध्ये जनजागरण व समुपदेशन करावे, नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, एखादा संशयित आढळून आल्यास तात्काळ संबंधीत आरोग्य अधिका-यांच्या निदर्शनास आणून द्यावे, झोनमध्ये जिवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा व्यवस्थित होत असल्याबाबतची खात्री करावी, याबाबत काही समस्या उद्भवल्यास तात्काळ अपर तहसिलदार औरंगाबाद व अन्नधान्य वितरण अधिाकरी औरंगाबाद यांच्या मार्फत जिल्हा पुरवठा अधिाकरी यांच्याशी संपर्क करावा, अनावश्यकरित्या नागरिक एकत्र जमा होत असल्याचे दिसून आल्यास सदरील बाब संबंधित पोलिस अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून द्यावी, झोनमध्ये काम करतसना योग्य ते सामाजिक अंतर पाळावे अशाप्रकारचे कार्य करणे आवश्यक असल्याचेही प्रसिध्दी पत्रकात कळविण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.