सोयगाव । वार्ताहर
कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात आले आहे त्यामुळे या संकटकाळी शासनाच्या सोबत राहून सामाजिक जवाबदरीचे भान ठेवून तिरूपती अर्बन को- क्रेडिट सोसायटी लि. सोयगावचे वतीने मा.मुख्यमंत्री सहायता निधीस रु.11000( अकरा हजार) चा धनादेश तिरूपती अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.सोयगावचे चेअरमन रामदास लालचंद राजपूत यांनी सहकार अधिकारी मरमट साहेब सोयगाव यांचेकडे सुपूर्त केला.
या प्रसंगी चेअरमन रामदास राजपूत, व्हा.चेअरमन प्रदिप जैस्वाल, तथा संचालक अशोक खेडकर, डॉ.दिनकर पिंगाळकर, किशोर पाटील, संजय वाडेकर, गोपाल दुसाने, विष्णू परदेशी, सरलाबाई आगे, रेखाबाई पंडीत, राधाबाई बोरसे, शारदाबाई तिडके, नरेश कांधारी, तुकाराम तायडे, श्रीकांत बोरसे, कार्यलय कर्मचारी व्यवस्थापक विकास देसाई, रविंद्र साखळे, गणेश तेली, ज्ञानेश्वर एलिस हे उपस्थित होते.
Leave a comment