औरंगाबाद / वार्ताहर
औरंगाबाद कोरोना ने घेतला दोघांचा बळी औरंगाबाद मध्ये उन्हाचा कहर सुरू असून काल रात्री पुन्हा दोघांचा बळी गेला आहे दिवसभरात चोवीस रुग्ण आढळले असून आतापर्यंत 677 जणांना कोरोनाची लागन झाली आहे प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही औरंगाबाद करांवर याचा काहीही परिणाम होत नसल्याचे दिसून आले आहे
 घाटी रुग्णालयात एका ९४ वर्षीय वृद्धेचा
आणि ५६ वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती
मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली.या दोन मृत्यूमुळे
शहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे.
बीड बायपास परिसरातील अरुणोदय कॉलनी येथील ९४ वर्षीय वृद्धेला
मंगळवारी दुपारी ४.४५ वाजता घाटीत दाखल करण्यात आले होते. त्यांना
भरती करण्यात आले तेव्हा त्या बेशुद्ध होत्या. दुपारी ५ वाजता त्यांचा मृत्यू
झाला. त्याचा कोरोनाचा अहवाल रात्री ८ वाजता पॉझिटिव्ह आला.
तर हुसेन कॉलनी येथील ५६ वर्षीय महिलेला मंगळवारी सकाळी १०.१७
वाजता घाटीत दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना दुपारी
१२.२० वाजता मृत्यू झाला. त्यांची अहवाल रात्री ८ वाजता पॉझिटिव्ह आला होता ,औरंगाबाद मध्ये दिवसेंदिवस कोरोना कहर वाढतच आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.