खुलताबाद । वार्ताहर
सर्वत्र लॉकडाऊन असतांना जो व्यक्ति मुंबईहुन खुलताबादला पायी आला होता त्याच्या संपर्कात आलेल्या अकरा नातेवाईकांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे खुलताबाद शहरासह तालुका धोक्या बाहेर आला असल्याची माहिती तहसीलदार राहुल गायकवाड माहिती यांनी दिली.यामुळे खुलताबादकरांनी आता सूटकेचा श्वास सोडला आहे. खुलताबाद शहरात कोरोनाचा एक 30 वर्षीय पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण खुलताबाद तालुक्याला मोठा धक्का बसला होता.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने त्याच्या भावासह इतर दहा नागरिक अशा अकरा जणांना नंद्राबाद येथील पेस सेंटरमध्ये क्वारंटाईन केले होते. याशिवाय शहरातील राजीवगांधीनगर आणि सुलीभंजन परिसर पूर्णपणे सील ही करण्यात आला आहे.
मुख्य म्हणजे हा 30 वर्षीय तरुण आपल्या कुटुंबासोबत शहरातील राजीव गांधीनगरमध्ये भाड्याच्या घरात राहतो. दोन महिन्यांपूर्वी तो कामासाठी मुंबईला गेला होता. मात्र गेल्या दीड दोन महिन्यांपासून संपूर्ण देशभरात कोरोनाने थैमान घातला असुन सरकारने लॉकडाऊन घोषित केले. यामुळे या त्या तरुणाला मुंबईतही काम मिळाले नाही.त्यामुळे काही दिवसांपूर्वी तो मुंबईवरून खुलताबादकडे पायी निघाला होता. सुलीभंजन येथे त्याचा भाऊ राहतो.प्रथम तो भावाच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याची शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. आणि दूरदैवाने शुक्रवार त्याचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने त्याच्या भावासह इतर दहा नागरिक अशा अकरा जणांना नंदराबाद येथील पेस सेंटरमध्ये क्वारंटाईन केले असुन त्या अकरा लोकांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे खुलताबादकरांनी मोकळा श्वास सोडला आहे.
Leave a comment