पैठण । वार्ताहर

येथील ग्रामिण आरोग्य प्रशिक्षण पथक, पैठण येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच ब्रदर परिचारक/ परिचारीकांच्या उपस्थितीत सावन कृपाल रुहानी मिशन, पैठण आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने परिचारक दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्व परिचारीकांना शुभेच्छा देतांना रामचंद्र आहूजा यांनी या कोरोना प्रादूर्भावाच्या काळात शर्थीने काम करीत असलेल्या सर्व परिचारक/परिचारीकांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. या अभिनंदनाचा स्विकार करतांना दवाखान्याच्या ज्येष्ठ परिचारिका श्रीमती रजनी ढाकणे ह्यांनी सर्वांचे आभार मानून झालेल्या कौतुकामुळे भविष्यात अजून जोमाने काम करण्याची स्फूर्ती मिळाली असल्याचे सांगितले. 

याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अवसरमल, डॉ. संदिप रगडे, यांच्यासह  सावन कृपाल रुहानी मिशन पैठणचे रामचंद्र आहूजा, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे नानक वेदी, प्रतिसाद संघटनेचे विष्णू ढवळे, संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी वर्ग परिचारक/परिचारीका आदी उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.