सोयगाव । वार्ताहर
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या पासून सुरक्षित राहण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सौजन्याने तालुका शिवसेना व युवा सेनेच्या वतीने सोयगाव नगरपंचायत व तालुक्यातील ग्रामपंचायतींना सेनेटायझरचे वाटप करण्यात येत आहे.
यावेळी प्रभाकरराव (आबा) काळे, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप मचे, जिल्हा परिषदेचे सदस्य गोपीचंद जाधव, शिवसेना सोयगाव शहर प्रमुख गजानन चौधरी, कृष्णा राऊत, संतोष बोडखे,दिलीप देसाई, रमेश गव्हांडे, चंद्रास रोकडे, शेख बबलू, शरीफ शहा,दिपक बागुल, समाधान काळे,आदींची उपस्थिती होती. शिवसैनिकांनी सरपंच, ग्रामसेवकांना गावात जाऊन सेनेटायझर दिले. याबाबत विविध गावच्या सरपंच व ग्रामसेवकांनी ना.अब्दुल सत्तार तसेच शिवसेना व युवासेना च्या या उपक्रमाबाबत आभार व्यक्त केले.
Leave a comment