बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात शुक्रवारी पाठवलेले 9 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर शनिवारी (दि.9) सकाळी 23 जणांचे थ्रोट स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्यात आले आहेत.
आज सायंकाळपर्यंत स्वॅबचा अहवाल प्राप्त होऊ शकतो. बीड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून 16 तर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातून 5 आणि परळी उपजिल्हा रुग्णालयातून 2 जणांचे स्वॅब तपासणीला गेले आहेत,असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले.दरम्यान शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात एकूण तपासणी झालेले 296 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत.
Leave a comment