सिल्लोड । वार्ताहर
महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या सूचनेने सिल्लोड तालुका शिवसेना - युवासेनेच्या वतीने लॉकडाऊन काळात रस्त्याने पायी जाणारे कामगार व गरजू नागरिकांना मोफत भोजन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील शिवसेना भवन येथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही भोजन व्यवस्था सुरू असणार आहे अशी माहिती युवानेते अब्दुल समीर यांनी दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे विविध ठिकाणचे कामगार आपापल्या गावी किंवा लगतच्या रेल्वे स्टेशन पर्यंत जाण्यासाठी रस्त्याने पायी जाताना दिसत आहेत. अशा लोकांसाठी तालुका शिवसेनेच्या वतीने भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. औरंगाबादहून भुसावळ रेल्वे स्टेशन कडे परराज्यात जाणार्या कामगारांसाठी सिल्लोड येथील जळगाव रोडवरील महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे सदरील भोजन व्यवस्था सुरू करण्यात आली असल्याने आळंद ,भवन , बनकीन्होळा किंवा इत्यादी रोड लगत राहणार्या शिवसैनिकांनी रस्त्याने पायी जाणार्या अशा गरजू लोकांना या उपक्रमाची माहिती द्यावी असे अवाहन युवानेते अब्दुल समीर ,शिवसेना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे, निराधार योजनेचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, युवा सेनेचे शहराध्यक्ष शिवा टोम्पे आदींनी केले आहे.
Leave a comment