पाचोड । वार्ताहर
घरामध्ये स्वयंपाक करत असताना अचानक स्टोव्हने भडक घेतल्याने पाचोड येथील विवाहिता जळून गंभीर जखमी झाली असून ही घटना गुरुवार दि.7 रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की पाचोड येथील कल्याण नगर भागात गोरख पवार हे आपल्या कुटुंबासोबत राहत असून त्यांची पत्नी पूजा गोरख पवार (वय30) वर्षे ही स्वयंपाक करत असताना अचानक स्टोव्हने भडका घेतल्याने 60 टक्के जळून गंभीर जखमी झाली असून तिला तात्काळ नातेवाईकांनी जखमी जळालेल्या अवस्थेत पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे पाठवण्यात आले असून या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर मोहिते हे करीत आहेत
Leave a comment