24 हजार रुपये किमंतीचे 1200 लिटर रसायन केले नष्ट
फर्दापूर । वार्ताहर
मालखेडा (ता.सोयगाव) शिवारातील गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा मारुन फर्दापूर पोलिसांनी 24 हजार रुपये किमंतीचे 1 हजार दोनशे लिटर रसायन नष्ट करुन आरोपी विरूध्द फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे जमादार बाजीराव धनवट पो.कॉ रवींद्र सावळे प्रविण गवई ज्ञानेश्वर सरताळे,दिपक सोनवणे,नारायण खोडे यांच्या पथकाने गुरुवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास केली आहे.या बाबत पोलिस सुत्रान कडून प्राप्त अधिकृत वृत्त असे की औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या मालखेडा (ता.सोयगाव) शिवारात अवैधरीत्या हातभट्टी लावून मोठ्या प्रमाणात गावठी दारू ची निर्मिती करुन या दारूची औरंगाबाद-जळगाव व बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात विक्री करण्यात येत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून पोलिसांना प्राप्त झाली होती या माहीतीच्या आधारे गुरुवारी रात्री 11:30 सुमारास साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे यांच्या नेतृत्वात फर्दापूर पोलिसांच्या पथकाने मालखेडा शिवारातील एका शेताच्या नाल्याजवळ छापा मारला असता त्या ठिकाणी पोलिसांना अवैधरीत्या हातभट्टी लावून गावठी दारूची निर्मिती करण्यात येत असल्याचे दिसून आले दरम्यान पोलिसांनी हातभट्टी उध्वस्त करुन कारवाई करीत मोह गुळ नवसागर मिश्रित गावठी दारु पाडण्यासाठी प्रत्येकी दोनशे लिटर क्षमतेच्या सहा ड्रममध्ये साठवलेले 24 हजार रुपये किमंतीचे 1 हजार दोनशे लिटर रसायन नष्ट करुन फरार आरोपी शेख इम्रान शेख युनुस(रा.तोंडापूर ता. जामनेर) विरूध्द फर्दापूर पोलिस ठाण्यात करण्यात आले.
Leave a comment