बीड | वार्ताहर
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून शुक्रवारी (दि.8) सकाळी नऊ जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.सायंकाळी त्याचा रिपोर्ट प्राप्त झाला.हे सर्व 9 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी दिली.
शुक्रवारी पाठवलेले सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने बीड कोरोनामुक्त कायम राहिले आहे. जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई व केज रुग्णालयातून पाठवलेले आजपर्यंतचे सर्व 296 अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत.
Leave a comment