औरंगाबादजवळ परप्रांतीय मजुरांवर काळाचा घाला
औरंगाबाद | वार्ताहर
रेल्वे पटरीवरून चालत जाताना थकल्यानंतर पटरीवरच अंग टाकलेल्या १९ मजुरांना झोपेतच मालवाहू रेल्वेने चिरडले. यात १४ ठार तर दोघे जखमी झाले. सुदैवाने तिघांचा जीव वाचला. करमाडजवळ (ता. औरंगाबाद) शेंद्रा एमआयडीसीच्या नवीन उड्डाणपुलाजवळ आज शुक्रवारी (दि.8) पहाटे हा भीषण अपघात झाला. ठार झालेलेेेे मजूर मध्यप्रदेशमधील आहेत.
लॉकडाऊनमूूळे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना सरकारने सर्वांना आपल्या गावी परतण्याची परवानगी दिली आहे. खिशात पैसे नसल्याने अनेक मजूर कुटुंबियांसह पायी प्रवास करीत आहेत. रेल्वेने सरळ रस्ता आहे, असे समजून १९ मजूर पटरीवरन पायी चालत होते. चालून चालून थकल्यामुळे ते करमाडजवळ पटरीवरच झोपी गेले. पहाटे गाढ झोपेत असताना मालवाहू रेल्वे आली. मजुरांना झोपेत काहीही समजले नाही. रेल्वेने त्यांना चिरडल्यानंतर एकच आक्रोश झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, ग्रामीण पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक व कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. ठार झालेले मजूर हे मध्यप्रदेश येथील असून ते रेल्वे लाईनने पायी औरंगाबादकडे येत होते. औरंगाबादहुन रेल्वेने गावाकडे जाण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. मृतदेह औरंगाबाद येथील घाटीत पाठविण्याचे काम घटनास्थळी चालू आहे..
Leave a comment