भराड़ी । वार्ताहर
येथून जवळ आलेल्या वांगी खु येथील संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणारी हापशी 1 महिन्यांपासून बिघाडलेली होती,पालोद धरणावरुन पाणी पुरवठा एखाद्या वेळेस खंडीत झाले तर दुसरा पर्याय म्हणून या हापशीचा वापर करण्यात येतो.
हापशी बंद पडल्याने भयंकर त्रास गावकर्यांना सहन करावा लागत होता, ही बाब गावातील जेष्ठ नागरिकांनी विशाल पाटील मुरकुटे यांच्या निदर्शनास आणून दिली.विशाल मुरकुटे यांनी बि.डी ओ प्रकाश दाभाडे यांच्याकडे शिफारस केली.व दाभाड़े यांनी लगेच कर्मचार्यांना पाठवुन हात पंप दुरुस्ती करण्यात आले..यावेळी विशाल मुरकुटे,अरून दांडगे,आशपाक पठाण, अंकुश मुरकुटे , श्रीकांत दांडगे,पंडीत बोरसे,दत्ता साबळे आदिंनी हापशी दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या कर्मचार्याना मदत केली.
Leave a comment